|
०३ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १८३१ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म.
२. १९५० पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय
रासायनिक प्रयोग शाळेचे उदघाटन. ह्यामिल्टन इलेक्ट्रिक कंपनीने
जगातील बैटरीवर चालणारे घडयाळ काढले.
३. १९४७ अमेरिकन संसदेच्या कामकाजाच्या प्रथमच टेलेवीजन चित्रीकरण
करण्यात आले. |
||
|
सामान्यज्ञान – ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहीती घेऊन त्यांचे कार्य
जाणून घेणे. |
||
|
सुविचार – काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो. |
||
|
बोधकथा – शेतकरी व कुत्रा – एक शेतकरी घरी आला तेव्हा झोपी गेलेले मुल पाळण्यात पालथे पडले
होते. त्याचे कपळे रक्ताने माखले होते. जवळचा कुत्रा बसला होता.
शेतकऱ्यांस वाटले,
कुत्र्यानेच आपले मुल मारले. म्हणून त्याने रागाच्या भरात हातातील
कुदळ कुत्राच्या डोक्यात घालून त्याचे प्राण घेतले पाळण्याजवळ जाऊन
पाहतो तो तिथे एक मोठा साप मारलेले दिसला. तेव्हा कुत्र्यानेच
मुलाचे रक्षणासाठी या सापाचे तुकळे करून टाकले असावे हे
शेतकऱ्यांचा लक्षात आले.
बोध – अविचारी कृत्याने स्वत:चेच नुकसान होते. |
||
सामान्य ज्ञान
०३ जानेवारी
सावित्रीबाईच्या शाळेत सुरुवातील शाळेत सहा मुली होत्या,
पण १८४८ साल संपेपर्यंत हि संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. सनातन्यांनी
विरोध केले. अंगावर शेन फ्हेक्ले. काही उन्मत्त्यानी तर अंगावर हात
टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईचा
शिक्षन्प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले.
सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डागमगल्या नाहीत.
शिक्षनाचा प्रसारासाठी अन्य सामाजिक शेत्रांताई काम करणे गरजेचे आहे
हे,
स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईणा ओढखले. काही
क्रूर रुदिनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली
वयाच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या
निधनानंतर असा विधवांना सती जावे लागे किवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप
बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेले या विधवा मग कुणातरी नराधमाचा शिकार
बनत. गरोदर विधवा मग म्हणून समाज छळ करणार,
जन्माला येणाऱ्या मुलाला यात्नाशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या
विधवा आत्महत्या किवा भून्ह्त्या करत.
ज्योतीरावणी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. या
बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत.
याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मुल त्यांनी दत्तक घेतले.
त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप
घडवून आणणे,
पुनर्विवाहाचा कायदा व्हवा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे
सावित्रीबाईनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक कार्यातही सावित्रीबाईचा मोठा
सह्बाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (ई.स. १८९० ) सावित्रीबाईना
सत्यासोधक समाजाच्या कार्यातही धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार
त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्य्फुले’ व ‘बावनकशी
सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची
भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
ई.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईनी समाजाला सत्कार्याचा आदर्श
घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाय-बापड्यानी दुष्टांचा तावडीतून
सोडवून त्यांनी त्यांना सत्य्सोधक कुटुंबात आश्रयास पाठविले. त्यांच्या
कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई,
गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तकेकाव्य्फुले (काव्यसंग्रह)
1. सावित्रीबाईची गाणी (१८९१)
2. सुबोध रत्नाकर
3. बावनकशी
गूगल डूडल
Ø ३ जानेवारी,
२०१६ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित त्यांचे गुगल
डूडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले यांच्यावर प्रकाशित साहित्य, कार्याकर्म वगेरे
1. Savitribai – Journey of a Trailblazer (publisher : Azim Premji
University)
2. “हा मे सावित्रीबाई फुले” (हिंदी), (प्रकाशक : अझीम प्रेमजी विद्यापित)
3. सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
4. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
5. Savitribai Phule (इंग्रजी, N.K.Ghorpade)
6. कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले (लेखिका डॉ. किरण नागतोडे)
7. सावित्रीबाईचा संघर्ष (के.डी. खुर्द)
8. थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (केतन भानारकर)
9. पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले (गौरी पाटील)
10. युग्स्त्री सावित्रीबाई फुले (विठल लांजेवार)
11. सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए.उगले)
12. सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी.पाटील)
0 Comments