|
११ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. २००१ एस.पी.भरुचा यांनी भारताचे ३०
वे सरन्यायधीश म्हणून कार्यभार सांभाळला. २. २००० छत्तीसगड उच्च
न्यायालयाचीस्थापना. ३. १९९९ कमाल जमीनधारण कायदा रद्द
करणार वटहुकुम केंद्र सरकारकडून जरी. |
||
|
सामान्यज्ञान –
न्यायमंडळ कसे काम करते हे जाणून घेणे. |
||
|
सुविचार –
क्रांती तलवारीने घडत नाही ते तत्वाने घडते. |
||
|
बोधकथा – कपट =
शेतकऱ्याने कोमबडयाला हाक मारली तेव्हा तो पळू लागला. तेव्हा ससाणा म्हणाला, ओ वेड्या, मालक एवड्या प्रेमाने तुला हाक
मारत असता, तु असा पळून का जातोस? मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेले असते यावर कोंबडा म्हणाला अरे
ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाईकांना या मालकाने
प्रेमाने जवळ बोलावून, त्यांचा माना कापताना मी
पाहिले असल्याने त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न
करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर
नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही. बोध = प्रेमळ बोलण्यात कपटहि असू शकते. |
||
सामान्य ज्ञान
११ जानेवारी
वृतपत्र या लेखात मुख्य
शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही.
वृत्तपत्रे हि वाचकांच्या जीवनाशी, विचारांशी, ध्येयवादाशी
त्यांच्या सामान्य गरजा, त्यांचे प्रश्न त्यांवरील
अन्याय त्यांचे अभिमान त्यांचे आनंद आणि दुख हि अशा वेगवेगळ्या प्रसंघाशी समरस
झालेली असते. ई.स. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले दर्पण हे मराठी
पत्रकारितेचे गंगोत्री समजली जाते.
वृत्तपत्रे हि अनेक
पानामधेय प्रकाशित होत असतात. काही वृत्तपत्रे हि दररोज प्रकाशित असतात. त्यांना
देनिक म्हणतात. काही वृत्तपत्रे हि आठवड्याला प्रकाशित होत असतात, त्यांना साप्ताहिक असे
म्हणतात. काही वृत्तपत्रे हि पंधरा दिवसांनी प्रकाशित होत असतात त्यांना पाषिक असे
म्हणतात. तर काही वृत्तपत्रे दर महिन्याला प्रकाशित होत असतात, त्यांना त्रीमाशिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्र दर तीन महिन्याला
प्रकाशित होतात त्यांना त्रीमाशिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्र हि दर सहा
महिन्याला प्रकाशित होत असतात, त्याला सहामाही असे
म्हणतात. तर दर वर्षी प्रकाशित होत असलेलेया वृत्तपत्राला वार्षिक असे म्हणतात.
0 Comments