Ad Code

Responsive Advertisement

0६ जानेवारीवर सर्व साधारण माहीती


०६ जानेवारी

राष्ट्गीत – जन गण मन

प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे

संविधान – आम्ही भारताचे लोक

दिनविशेष – १. १९२९ गोरगरीब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

२. १९०७ मारिया माटेसरी यांनी पहिली मातेसरी शाळा सुरु केली. त्यांच्या शाळे मुळे पूर्वप्राथमिक शिक्षनात आमुलाग्र बदल झाला.

सामान्यज्ञान – ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहीती घेऊन त्यांचे कार्य जाणून घेणे.

सुविचार – प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

बोधकथा  सत्य्कार्याचे फळ = एका शेतकऱ्याला काटेरी झाडाला एक गरुड अडकलेला दिसला. त्याने त्याची सुटका केली. कडक उन्हामुळे शेतकरी एक पडक्या भिंतीच्या सावलीत बसला. इतक्यात गरुड खाली आला आणि त्याच्या डोक्यावरील पागोटे चोचीत पकडून दूर टाकले. शेतकरी संतापाने तिथून उतला आणि थोडे अंतर गेला नसेलतोच ती पडकी भिंत पडली हे पाहताच गरुडामुळे आज आपला जीव वाचला. त्याच्या ध्यानात आले आणि त्याने गरुडाचे श्तथ: मनापासून आभार मानले.

बोध = कर भला तो होगा भला

 

 

सामान्य ज्ञान

०६ जानेवारी

विकिपीडिया

विकिपीडिया हा महाजालावरील एक्मुक्ती ज्ञानकोश आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येतो. विकी हे सोफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरुपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणताही कारणासाठी आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्यचे निर्देश करणे आवश्याक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरीत करताना ती मुक्ती स्वरुपात वितरीत करणे आवश्यक असते.

विकिमिडिया फाउन्देशन हि ना नफा-ना तोटा तत्वावर चालणारी संस्था ह्या ग्यान्कोशाचा व्य्वस्तेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

जिमी वेल्स आणि लॉरी संगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवसी इंग्रजी भाषेत केली. आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ग्यान्कोशाचा शाखा उपलब्ध आहेत. विविध भाषांचे भाषक आपल्याला भाषेतील ग्यान्कोशाचा निर्मितीत सह्बागी होऊ शकतात. मराठी मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.

मराठी विकिपीडियावर सध्या ५३,७८९ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागयात एकूण तीन कोटीहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहिले गेले आहेत.

 

 

Post a Comment

0 Comments