|
२४ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १९६६
भारताच्या ३रया पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला. २. १९६६ एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान
युरोपातील आल्प्स पर्वतातील मोट ब्लॉक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील
अनुविग्यानाचे शिल्पकार डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले. |
||
|
सामान्यज्ञान – श्रीमती इंदिरा गांधी यांची माहीती. |
||
|
सुविचार –
क्रोध माणसाला पशु बनवितो. |
||
|
बोधकथा – माणूस आणि कासव = एक शहराच्या नदीकिनारी एक
म्हतारा एकटाच झोपडी बांधून राहत असे. जवळपास शेतामधून मोलमजुरी करून आपला
उदरनिर्वाह चालवत असे. त्याने आपला गरजा मर्यादित ठेवला होता. त्याने एक कासव
पाळले होते, त्याच्याशी त्याचा चांगलाच स्नेह होता.
शेतावरून घरी आल्यावर जेव्हा तो स्वतसाठी भाकरी बनवायला घेड तेव्हा तो कास्वसाठी
तो चणे भिजवत असे. कासावाविषयी म्हातार्याचा असे प्रेम पाहून आसपासचे लोक त्याची
खिल्ली उडवत. पण म्हाताऱ्याला त्याचे वाईट वाटत नसे. एक दिवस म्हातार्याचा एक
परिचित त्याला भेटण्यास आला. काही वेळ महातार्यासी गप्पा केल्यावर कासवाला पाहून
तो त्याला म्हणाला, ‘हा कसला घाणेरडा प्राणी घरात पाळला
आहे? बाहेर नेऊन तक त्याला.’ ते आयकून म्हाताऱ्याला खूप
वाईट वाटले, तो म्हणाला, ‘तुम्ही असे म्हणून माझ्या गुरूचा
अपमान करत आहात. ‘हे आयकून परिचित आश्चर्याने म्हणाला हा कसा काय गुरु बुवा? म्हतारा त्याला समजावत म्हणाला, ‘हे पाहा, जराशी कसली चाहूल लागली तर हे कासव आपले अवयव अकडून घेते. याच्या
प्रत्येक वेळी असे करण्यामधून मला शिकता येते कि, जगामध्ये पसरलेल्या कसल्याही
दुष्ट्वृत्ती तुम्हाला ग्रासू लागतात तेव्हा या कास्वप्रमाणे आपण आपलेविचार व
कृत्ती विवेकाने संकोचल्या गेल्या पाहिजेत आणि दृष्ट प्रवृत्तीपासून प्रवृत्त झाले
पाहिजे. अशी एवडी मोठी शिकवण यापासून मिळत आहे तर हा माझा गुरु नाही का? बोध =
खरंतर ईशवराने या जगाची रचना अशी केली आहे कि, प्रत्येक प्राणी दुसऱ्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊ
शकतो आणि जर सकारात्मक दृष्टीकोनाने अशा प्रेरणा घेतल्या तर आयुष्य सुखी बनवता
येऊ शकते. |
||
सामान्य ज्ञान
२४ जानेवारी
संगणकाचे प्रकार
सुपर कॉम्पुतर - सुपर कॉम्पुतर संगणकामध्ये इतर
संगणकातून एकत्र केलेल्या माहितीवर अतिशय वेगाने आकडेमोड किंवा प्रक्रिया घडवून
आणली जाते. यामध्ये अधिक प्रोसेसर्स बसवलेले असतात व प्रत्येक प्रोसेसार्काडे एक
एक काम सोपविले असते. आपल्या मेंदुप्रमानेच हे प्रोसेसर्स एकत्रितरीत्या काम करत
असल्याने काम अतिशय वेगाने होते. या संगणकाची क्षमता फ्लॉप ( Floating point Operations per Second ) या एककात मोजली जाते. सुपर कॉम्पुतरमधील चीप हि ग्यालीयम अर्स्नाडची
बनविलेले असते व ती सिलिकॉन चीप्पेक्षा सहापट वेगाने काम करू शकते. सुपर कॉम्पुतरची
स्मरणशक्ती खूपच जास्त असल्याने ज्ञानाचे विशाल भांडार यात समावलेले असते व या
माहितीवर आधारित निष्कर्ष काढले जातात अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिसाईल डिझाईन, न्युक्लीयर रीयाक्तेर, खगोलशास्त्र, हवामानखाते, जेनेटिक इंजिनियरिंग ई. आतापर्यंत फक्त जपान व अमेरिका हे दोनच देश सुपर
कॉम्पुतरचे प्रमुख उत्पादक होते. पण मागील दशकात पुण्यातील सी-डयाक या संस्थेने
परम-१०००० हा सुपर कॉम्पुतर विकसित केला आहे.
मेन प्रेम कॉम्पुतर = मेंन प्रेम कॉम्पुतर आकाराने
खूपच मोठे असतात. एकाद्या मोठ्या खोलीत मावतील एवढे. हे संगणक अतिशय वेगाने
माहितीवर प्रक्रिया घडवून आणतात. एका सेकंदात किती सूचनांवर प्रक्रिया घडवून
आणल्या जातात त्यावर यांची गतिमानता / क्षमता ठरविली जाते. महाग असूनही हे संगणक
वापरले जातात कारण याची माहीती साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. तेल्कोसारख्या
मोठ्या कंपन्यामध्ये तसेच विद्यापीठ, रेल्वे आरक्षण ई. ठिकाणी मेन प्रेम कॉम्पुतर
वापरला जातो व ह्या माहितीतून आवश्याक तेवढीच माहीती वेगळी करून वापरता येते.
त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी एकाच प्रकारच्या माहितीवर वेगवेगळी कामे करू शकतात.
0 Comments