|
०१
फेब्रुवारी
|
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १८८४
ओक्स्फरड इंग्लिश डीकशनरीचे पहिली आवृत्ती प्रकाशित. २. २००३ अंतराळातून परतताना सपेश शटल कोलंबियाचे
स्फोट. कल्पना चावला सहित सात अंतराळवीर मृत्युमुखी. ३. १९५८ ज्याकी श्रॉफ भारतीय चीत्रपट अभिनेते
यांचा जन्म. ४. १९७१ अजय जडेजा भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा
जन्म. ५. १९८२ पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा
जन्म. |
||
|
सामान्यज्ञान = कल्पना चावला यांच्या वर माहीती. |
||
|
सुविचार = जीवनातील प्रत्येक क्षणी
शिकण म्हणजे शिक्षण. |
||
|
बोधकथा = घुबड आणि टोळ = एक म्हातारे घुबड झाडाच्या
ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे
म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तु येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस.
तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते. यावर to टोळ त्या
घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला तु लबाड चोर आहेस
रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.
त्यावर घुबड म्हणाले अरे तु आता आपला तोंड संबाळ नाहीतर मग पस्तावशील. तरीही टोळ
एकूण घेईना. घुबडाची निंदा करून to पुन्हा गाऊ लागला मग
घुबडाने त्याची खोटी स्तुत्ती करायला शुरुवात केली, ‘बाबा
रे, क्षमा कर. तुझ गायन अगदी गोळ आहे. माझ्या इतका वेळ ते
लक्षात आलं नाही. तुझ्या सारख गाणारा तूच. तुझ्या गानापुडे कोकीळाही लाजेल. तुझा
स्वर सारंगीपेक्षा चांगला चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी
आहे. त्यातले मी तुला थोडस देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून
गेला असेल नाही का? टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो
घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या
तोंडात टाकले. बोध =
आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा जे विचार
करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात. |
||
०१ फेब्रुवारी
कल्पना चावला (
मार्च १७ ई.स. १९६२ कर्नाल हरयाणा --- फेब्रुवारी १ ई.स. २००३ टेक्सासवर अंतराळात )
हि अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.
त्यांच्या वडिलांचे
नाव बनारसिलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगिता चावला असे होते. त्यांना
एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती.
नटणे घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणीबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस
वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती
करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वात लाडक्या होत्या. त्यांना सार्वजन लाडाने ‘मोट’
असे म्हणत. त्यंचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर
दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण
गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या
नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांचा हि त्या लाडक्या झाल्या होत्या.
त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या. भरतनाट्यम या कला प्रकारातही
त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. संजय हा त्यांचा भाऊ कार्नालच्या फ्लाइंग क्लबमध्ये
जात होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही
असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले.
पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनोतीक्ल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे
१९८४ मध्ये अल्रीन्ग्त्न टेक्सास विद्यापीठातून एरोनोतीक्ल उच्च अभियांत्रिकीशिक्षण
घेऊन त्यांनी क्यालोर्डो विद्यापिठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८
मध्ये डोक्तरेत मिळवली.
डिसेंबर १९९४ साली
चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन
विशेश्ग्य म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४
मिनिटे प्रवास केला.
0 Comments