|
०२ फेब्रुवारी
|
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १६५६ अमेरिकेत न्यूयाम्स्तेरधाम गावाची स्थापना पुढे याचे नाव
बदलून न्यूयॉर्क ठेवण्यात आले.
२. जागतिक पाणथळ भूमी दिन.
३. १८८० अमेरिकेत वाबाश इंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील
दिवा सुरु.
४. १९७० ब्तार्द्न रसेल ब्रिटीश गणितज्ञ व तत्वज्ञानी यांचा
मृत्यू. |
||
|
सामान्यज्ञान
= भारतीय गणितज्ञ भाष्क्रचार्य यांची माहीती व त्यावर
प्रश्नोत्तर. |
||
|
सुविचार = हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. |
||
|
बोधकथा
= अहंकारी राजाला धडा = एक अहंकारी रजा होता. त्याला आपल्या
ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रुपवारही तो
अहंगड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय
मिळाला कि त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत
असे. कोणाचा मुलाहिजा ण बाळगता त्याचा to
अपमान करत असे. दुसर्याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा या
कारणामुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान
पंडिताचे त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडित
राजाच्या दरबारात गेले आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे
प्रतीन्म्स्कारही केला नाही उलट त्याने पंडिताला गर्वाने विचारले.
“बोलो पंडित महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते
मागून घ्या , दान पाहिजे असेल तर दान घ्या किवा धन पाहिजे, सोनेनाणे,
जमीन,धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्या कडून मागून घ्या”
पान्दित्जीने राजाकडे एकावर पहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला.
राजाला व दरबारातील लोकांना पंडिताच्या हसण्याचे कारण काही कळेना,
हसण्याचे भर ओसेल्यवर पंडित म्हणाला,”राजन,तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच
नाही”पंडिताचे हे बोलणे ऐकताच राजा स्तापून लाल्बुद झाला, राजाचे
सेअनिक पंडिताला मारायला धावून आले सेनापती सेअनिकाना आवरले व
पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर
पंडितजी म्हणाले,”महाराज जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच
मुळी तुमच्या इच्छेने झाला,मग रूप,सोधर्य आणि परक्रम हे गुण तुम्हाला
कोठून मिळाले असते. आई वडीलानी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही
जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने
पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि
खजिन्याचे म्हणाला तर धन हे करातून आलेले मह्न्जेच प्रजेचे देणे आहे,
राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले
शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे
सगळेच जर तुम्हाला दुसऱ्यांना दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून
देणार आणि दिलेल्या गोष्टीच्या काय म्हणून गर्व बाळगणार. “एवडे बोलून
पंडिताने राजदरबार सोडला व राज्याने त्या दिवसापासून गर्व पान सोडून
दिला.
बोध
= जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यार्थ्पानाचे आहे. |
||
०२ फेब्रुवारी
भास्कराचार्य द्वितीय
राष्ट्रीयत्व
भारतीय
पेशा
गानित्ग्य
कारकीर्दीचा काळ
ई.स. १११४ ते ई.स. ११८५
मूळ गाव
विज्ज्ल्विड, महाराष्ट्र
ख्याती
गणितावर ग्रंथलेखन
धर्म
हिंदू
अपत्ये
लीलावती (कन्या)
वडील महेश्वरभट्ट
सामान्यज्ञान – भारतीय गानित्ग्य भास्कराचार्य यांची माहीती
भास्कराचार्य द्वितीय हे एक महान भारतीय गनित्ग्य होते. त्यांच्या वडिलांचे
नाव महेश्वरभट्ट होते व तेसुद्धा गणितात व ज्योतिषशासत्रात निष्णात होते. तेच भास्कराचार्यचे गुरु होते. भास्कराचार्यांचे जन्मगाव
सहाद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेले ‘विज्ज्ल्वीद’ हे होते. त्यांचे गोत्र
शांडिल्य होते, असे त्यांनीच त्यांच्या ‘गोलाध्याय’ या ग्रंथाथ श्लोकरुपात
नमूद केले आहे. ते शके १०३६ मध्ये (ई.स. १११४ मध्ये ) जन्मले व त्यांनी
वयाच्या ३६व्या वर्षी आपला ‘सिद्धांत शिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला.
भास्कराचार्य जन्म हा महाराष्ट्रात झाला. ‘विज्ज्ल्वीद’ हे त्यांचे जन्मगाव.
खान्देशातील चाळीसगावजवळ पाटण नामक गाव आहे. ते भास्कराचार्य जन्मगाव;
असेही काही संशोधकांचे मत आहे. तेथे ‘पाटणादेवी’ हि त्यांची कुलदेवता आहे.
आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी तसा उल्लेख केला आहे.
आसीत सयकुलाचलाश्रितपुरे त्रैविद्यविद्वज्जने |
नाना जज्जनधाम्नि विज्जडविडे शाण्डिल्यगोत्रोद्विजः ||
श्रौतस्मार्तविचारसारचतुरो निःशेषविद्यानिधी |
साधुर्नामवधिर्महेश्वरकृतीदैवज्ञचूडामणी
||
लीलावती हि भास्कराचार्यांची एकुलती एक मुलगी होती. तिचेच नाव त्यांनी एका
ग्रंथाला दिले.
धुळे जिल्यातील पाटनादेवीजवळच्या विज्ज्ल्विड या गावी भास्कराचार्यचे वडील
महेश्वर राहत. त्यांच्यापाशी बसून भास्कराचार्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
सामान्य बुद्धीच्या गन्कांना बोधकर होईल आणि चतुर व ज्ञानी गणकांचा मनात
प्रीती उत्पन्न करेल असा ‘सिद्धांतशिरोमणी’
हा ग्रंथ भास्कराचार्यांनी लिहिला. हे सर्व खुद्द भास्कराचार्यांनी लिहुन
ठेवले असल्यानी हे मुद्धे वादाचे ठरू नयेत. ( कारण पूर्वी भास्कराचार्य
पाटणचे कि विज्ज्ल्विड असा वाद झालेला आहे. ) भास्कराचार्यांनी आपल्या
शिक्षणाबद्दल एक शलोक लिहिला आहे. त्यात ते म्हणतात की त्यांनी आठ
व्याकरणग्रंथ,
बहुधा पाणिनीची अष्टध्यायी, सहा वैद्य्ग्रंथ, सहा तर्कशास्त्रग्रंथ, पाच
गानित्ग्रंथ, चार वेद,
पाच भरतशास्त्रे आणि दोन मीमांसा ग्रंथ अभ्यासले. अगदी आधुनिक युगातील
बुद्धिमान व्यक्तीलाही तरुण वयात एवडे प्रचंड शिक्षण आत्मसात करणे केवळ
अशक्य आहे.
0 Comments