|
१९ जानेवारी |
||
|
राष्ट्गीत – जन गण मन |
प्रतिज्ञा – भारत माझा देश आहे |
संविधान – आम्ही भारताचे लोक |
|
दिनविशेष – १. १९८६
(C) brain
नावाचा कॉम्प्यूटरचा पहिला व्हायरस पसरण्यात सुरुवात झाली. २. १९६८ पहिली यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया
डॉ.क्रीस्तोपर बर्नाड यांनी केली. ३. देशातील सर्व
विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. ४. १९५४ कोयना
धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन. |
||
|
सामान्यज्ञान – संगणकाचा शोध कसा लागला याची माहीती जाणून घेणे. |
||
|
सुविचार – पिंजऱ्यात
कोंडून पाखरा कदीच आपली होत नाहीत. |
||
|
बोधकथा –आपल्या चंदर खोगीराची एका घोड्याला घमेंड
वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाडव चालला होता. तो त्या घोडयाला वाट
करून जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतविळपने त्याला म्हणाले,’ए, जा
रे हट . चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.‘बिचारे गडाव गप्पच राहिले.पण
घोड्याचे ते उधतासारखे वागणे त्याच्या मनात राहिले.काही दिवसांनी तो घोडा म्हतारा
व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका
शेतकऱ्याला विकला आता त्या शेतकऱ्याचा शेणखताचा गाढा ओढून नेण्याचे काम
त्याला करावे लागत होते. भागाला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना
पूर्वीचे गाढव त्याला भेटले. त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, ‘ओहो,
कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीच छानदार खोगीर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटल होतं का तुम्हाला?’... बोध = जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदेव ध्यानी बाळगावे. |
||
सामान्य ज्ञान
१९ जानेवारी
पहिल्या यांत्रिक संगणकांचा शोध
संगणक म्हण्जे काय?
संगणकाला इंग्लिश मध्ये कॉमप्यूतर (Computer) असे म्हणतात. ‘Computer’ हा शब्द ‘compute’ या इंग्लिश क्रिया पदा पासून
बनला आहे. COMPUTER म्हण्जे आकडे मोड किवा गणना करणे. ५०
वर्षा पूर्वी जेव्हा कॉमप्यूतर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा
वापर मुख्यात आकडे मोड करण्यासाठी केला जात असे, परंतु
दिवसोन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकडे संगणकाचा वापर तर अनेक
प्रकारे होवू लागला आहे. उदा. माहीती पाठवणे, तिचे वर्गीकरण
करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असख्य
कामासाठी संगणकाचा वापर केला जातो.
0 Comments